कळंब -: भोंदुगिरी व बुवाबाजी करुन सर्वसामान्‍य जनतेस लुबाडणा-या, फसवणा-या मलकापूर (ता. कळंब) येथील भोंदु महाराज एकनाथ सुभाष लोमटे यांची नियुक्‍ती न्‍यायाधीश व सामाजिक कार्यकर्त्‍यांच्‍या नियंत्रणाखाली समिती स्‍थापन करुन त्‍यांची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्‍टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष प्रदीप पाटील यांनी उस्‍मानाबाद जिल्‍हाधिका-यांकडे केली आहे.
       निवेदनात म्‍हटले आहे की, मलकापूर येथील भोंदू महाराज एकनाथ सुभाष लोमटे हा ब-याच दिवसापासून असाध्‍य रोग व जुनाट रोगावर खात्रीशिर उपचार म्‍हणून जडीबुटी, बुक्‍का, लिंबु, नारळ व प्‍लॉस्‍टीक पिशवीमधील जडीबुटीची पुडी देऊन स्‍वतःचा फोटो, दोन पुस्तिका, कॅसेट देऊन प्रत्‍येकी साडे चारशे रुपये घेऊन अनेक भोळ्या भाबड्या गोर गरीब जनतेकडून प्रचंड प्रमाणात पेसे उकळत आहे. याप्रकरणी त्‍यांच्‍यावर बुवाबाजी, जादुटोणा विरोधी विधेयक 2013 अन्‍वये कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती. या निवेदनाची तात्‍काळ दखल घेऊन जिल्‍हाधिकारी यांनी तहसिलदारांना आदेश करुन समिती स्‍थाप करुन त्‍यामध्‍ये तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कळंब यांच्‍या अध्‍यक्षतेखाली एक समिती स्‍थापन केली होती. या समितीमध्‍ये पुढीलप्रमाणे सदस्‍य आहेत. येरमाळा पाेलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, बीट कॉनस्‍टेबल, गटविकास अधिकारी कळंब, ग्रामसेवक मलकापूर, तलाठी, सदस्‍य सचिव निवास तहसिलदार यांचा समावेश आहे.
       सदर समितीने भोंदु बाबा एकनाथ लोमटे यांनी फसवणूक केलेल्‍या पुराव्‍याची तपासणी करुन दि. 21 एप्रिल पर्यंत कार्यवाही करुन अहवाल जिल्‍हाधिकारी यांना सादर करावे, असे आदेश दिले आहेत.   
        जिल्‍हाधिका-यांकडे अखिल भारतीय भ्रष्‍टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रदेश विधी विभागाचे अध्‍यक्ष अॅड. प्रदीप रितापूर, प्रदेश सरचिटणीस सचिन क्षिरसागर, प्रदेश उपाध्‍यक्ष अतुल मुंडे, जिल्‍हाध्‍यक्ष अतुल बांगर  यांनी अशी मागणी केली आहे की, तहसिलदार कळंब यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या समितीतील सर्व सदस्‍य हे शासकीय असल्‍याने तसेच भोंदुबाबाएकनाथ लोमटे यांची चौकशी ही निपक्षपती व पारदर्शक होण्‍यासाठी ही समिती निवृत्‍त न्‍यायाधीश व काही स्‍थानिक सामाजिक कार्यकर्त्‍यांच्‍या नियंत्रणाखाली स्‍थापन केल्‍यास सर्वसामान्‍यास योग्‍य न्‍याय मिळेल, अशी मागणी करण्‍यात आली आहे.
        
 
 
Top