![]() |
धोंडीराम बिराजदार |
पांगरी (गणेश गोडसे) :- मार्च महिन्यात महाष्ट्रातील तीन जिल्हयातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे द्राक्षे तोडुन घेऊन जावुन पैसै न देता बनावट सहयांचे धनादेश वाटप करून त्या शेतक-यांना टोपी घालुन पसार झालेल्या धोंडीराम अंकुश बिराजदार (वय 40 रा.वाशी मुंबई), मुळ रा. उमरगा, जि.उस्मानाबाद) या महत्वाच्या सुत्रधार आरोपीस सोमवार रोजी पहाटे त्याच्या मुंबईतील घरातुन छापा टाकुन पांगरी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार फसवणुक प्रकरणात राज्यासह परराज्यातुन ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची संख्या चारवर गेली आहे. यातील प्रमुख सर्वच आरोपी पांगरी पोलिसांच्या हाती लागल्यामुळे राज्यभर व्याप्ती असलेल्या द्राक्ष फसवणुक प्रकरण निकाली निघण्याची आशा निर्माण झाली असुन फसवणुक ग्रस्त शेतक-यांमधुन समाधान व्यक्त केले जात असुन लवकरच पैसै आपल्या हातात पडतील, अशी आशा ते धरून आहेत.
दरम्यान गुजरात राज्यामध्ये पळुन गेलेल्या या फसवणुक प्रकरणातील मुख्य आरोपी ओमविर मुन्नालाल ठाकुर (वय 38, रा.हल्ली सुरत, मुळ आग्रा) यास सुरत येथील निवास्थानातुन यापुर्वीच अटक करण्यात आले आहे. तसेच भुम तालुक्यातुन दोघांना यापुर्वीच वाहनासह ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतरच या प्रकरणाला गती मिळुन सुरतच्या लुटारूला बेडया ठोकण्यात पोलिसांना यश आले होते.
डिसेंबर ते 12 मार्च या चार महिन्यात सुरत येथील ओमविर ठाकुर या ठकसेनाने मुंबईतील धोंडीराम बिराजदार या व्यापा-यांच्या मदतीने भागीदारीत व्यापार करत सोलापुर, उस्मानाबाद व नाशिक जिल्हयातील असंख्य शेतक-यांना चलाखीने फसवुन द्राक्षे बाजारपेठेत नेऊन विकली होती व त्यांचे पैसै न देता व मुंबईस्थित या व्यापा-यांच्या नावाने बँक खाते असलेल्या वाशी येथील खात्याचे धनादेशाचे वाटप करून रात्रीतुन गाशा गुंडाळुन फसवणुक करणा-यांच्या टोळीने पलायण केले होते. यासंदर्भात पांगरी पोलिसात या फसवेखोरांवर पहिला गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान फसवणुक प्रकरणातील मुख्य आरोपी ओमविर ठाकुर यास सुरत येथुन अटक करून न्यायालयात उभे केले असता त्याला गुरूवार दि.10 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
द्राक्ष उत्पादक शेतकरी फसवणुक प्रकरणातील आरोपींना अटक करूण सोपस्कर पार पाडण्यात येत असताना आमच्या पैशाचे काय असा सवाल फसवणुक झालेल्या शेतक-यांमधुन विचारला जात असुन अगोदरच होरपळुन निघालेले असल्यामुळे आमच्या रकमेचा विचार होऊन यातुन आमची सुटका करावी, अशी या प्रकरणातील शेतक-यांची मागणी आहे.