बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शाहू,फुले आंबेडकर यांची नावे घेण्याचा अधिकार केवळ आपल्यालाच आहे असे भासविणार्‍या शरद पवार यांनी मतदानासाठी हाताला लावलेली शाई पुसा आणि दोनदा मतदान करा असे म्हणून पुन्हा आचारसंहितेचा ससेमिरा चुकविण्यासाठी आपण टिंगल केली असल्याचे बोलून बोळवण केली आहे. आपणही त्यांच्या कानाखाली जाळ काढा म्हणतो आणि टिंगल केली असे म्हणतो मग काय हरकत आहे असा प्रतिसवाल धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला.
    सोमवारी सायंकाळी राजेंद्र मिरगणे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसैनिक, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी उपस्थित विचारणा केलेल्या जाहीससभेत पालकमंत्री दिलीप सोपल यांनी वक्तव्य केलेल्या रवि गायकवाड शरद पवारांवर घसरले याला उत्तर देण्यासाठी ते बोलत होते. गायकवाड म्हणाले, निवडणुकांसाठी आचारसंहिता ही पूर्वीही लागू होती व राबविण्यात येत होती. टी.एन.शेषण यांनी ते सक्षमपणे दाखवून दिले आहे. शरद पवार यांनी दोनवेळा पक्ष स्थापन करुन कॉंग्रेसमध्ये विलीन केला आहे. शिवसेना प्रमुखांचे चिचार घेऊन निघालेल्या शिवसेनेत शेकडो सर्वसामान्य, निर्धन लोकांना उमेदवारी देऊन आमदार, खासदार, मंत्री केले आहे अशा किती लोकांना शरद पवारांच्या पक्षाने तिकीटे देऊन विजयी केले आहे. आपल्या विरोधक डॉ.पाटील यांच्या विरोधात आण्णा हजारे देखिल उस्मानाबाद येथे येऊन उपोषण करणार आहेत. आपल्यासोबत असलेल्या सर्व सहा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह आणखी चार भाऊ मदत करीत आहेत. शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक मातब्बर इच्छुक होते त्याउलट कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही सक्षम उमेदवार मिळाला नसल्याने नाईलाजाने शिक्षा भोगलेल्या पद्मसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
    बार्शीच्या प्रश्‍नांबाबत बोलतांना रेल्वेचा दुहेरी मार्ग होण्यासाठी महायुतीची सत्ता आल्यानंतर प्रयत्न करु, द्राक्षाच्या उत्पादसाठी देशाला मार्गदर्शन करणार्‍या बार्शी तालुक्यातील बागायतदारांची आज अत्यंत दुर्दशा झाली आहे. अनेक शेतकरी उध्वस्त झाले आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करु.
   
 
Top