नवी दिल्ली :- आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना दिल्ली येथील दक्षिणपूरी परिसरात एका अज्ञात व्यक्तीने कानाखाली थप्पड मारल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दक्षिणपूरी परिसरात अरविंद केजरीवाल खुल्या जीपमधून प्रचार करीत होते. यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर झडप मारली. त्यांना थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा हात पोहोचला नाही. केजरीवाल यांच्या गळ्यावर ही थप्पड लागली. त्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीची यथेच्छ धुलाई केली. यावेळी केजरीवाल त्याला मारू नका असे सांगत होते. परंतु, उग्र जमावापुढे त्यांचे काही चालले नाही. त्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधिन केले.
दरम्यान, केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याला गांभीर्याने घ्यायला हवे, असे आपने म्हटले आहे.