मंगळवेढा (समाधान फुगारे) :-
लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील बाबासाहेब रामचंद्र जुंदले यांचे छप्पर जळून सुमारे अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. आमदार भारत भालके, सभापति शंभाजी गावकरे, दामाजी कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे, यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेटी दिल्या.
या आगीमध्ये 15 पोती ज्वारी, 5 पोती शेंगा, 3 पोती गहू, 18 पोती रासायनिक खते, 5 तोळे सोने हे जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या आगीमध्ये 15 पोती ज्वारी, 5 पोती शेंगा, 3 पोती गहू, 18 पोती रासायनिक खते, 5 तोळे सोने हे जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.