येत्या 17 एप्रिल रोजी 42- सोलापूर व 43- माढा लोकसभा तदारसंघासाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक खुल्या व भयमुक्त वातवरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. सोलापूर जिल्ह्यातील या लोकसभेच्या निवडणूक व त्याच्या तयारीविषयी माहिती देत आहेत, जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण गेडाम........
* सर ! प्रथमत:लोकसभेच्या या दोन जागाबद्दल प्राथमिक माहिती सांगा .?
→ सोलापूर जिल्हा विस्ताराने मोठा आहे त्यामुळे या जिल्ह्यासाठी दोन खासदार पर्यायाने दोन मतदारसंघ आहेत. पूर्वी पंढरपूर लोकसभा मतदारसंघ होता. मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. तसेच जिल्ह्यातील मंगळवेढा व उत्तर सोलापूर विधानसभा हे मतदारसंघ निवडणूक आयोगाच्या पुर्नरचनेत वगळण्यात आले आहेत. तर बार्शी विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभेला जोडला असून माढा लोकसभा मतदारसंघासाठी सातारा जिल्ह्यातील माण व फलटण हे दोन तालुके समाविष्ट करण्यात आले आहेत.
* जिल्ह्यातील एकूण मतदार व मतदान केंद्राविषयी माहिती द्या ?
→ जिल्ह्यात साधारण: 3290 मतदान केंद्रे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे हा जिल्हा मोठा आहे. 1 जानेवारी 2014 च्या आकडेवारी नुसार सोलापूर लोकसभा (अ.जा.) मतदारसंघासाठी 16 लाख 64 हजार 775 तर माढा लोकसभेसाठी सातारा जिल्ह्यातील माण, फलटण तालुक्यासह सुमारे 16 लाख 92 हजार ,4 इतके मतदार आहेत.
* या दोन मतदारसंघासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराविषयी तसेच मतदान यंत्र स्थिती बाबत सांगा. ?
→ यंदा मतदार व या निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. सोलापूरसाठी 16 तर माढयासाठी 24 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभे आहेत. 16 उमेदवारांसाठी एक मतदान यंत्र (बॅलेट) लागते. यंदा निवडणूक आयोगाने नोटा म्हणजेच ' नन ऑफ दि अबॉव्ह ' अर्थात मराठीमध्ये वरीलपैकी कोणीही नाही. असा पर्याय मतदारांसाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिल्याने अधिकची मतदान यंत्रे (बॅलेट) लागतील त्यामूळे अर्थातच बाहेरून आणखीन मतदान यंत्रे मागवावी लागतील.

* बाहेरून यंत्रे मागविण्याबाबत प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाय योजनाविषयी सांगा. ?
→ सद्या निवडणूक यंत्रणेकडे 3673 मतदान यंत्रे तयार आहेत. याशिवाय 10 टक्के मशीन हे आरक्षित तर 5 टक्के मशीन प्रशिक्षणासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अतिरिक्त यत्रापैकी 1500 यंत्रे पुणे येथून 600 यंत्रे कोल्हापूर येथून तर उर्वरित 1 हजार पाचशे, 73 यंत्रे हैद्राबाद येथून आणण्यात येतील. उमेदवारांची संख्या वाढल्याने या दोन्ही जागासाठी मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे लागणार आहेत. तरी कंट्रोल मात्र एकच लागणार आहे. वाढीव मतदान यंत्राची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
* शेवटी काय आवाहन कराल.?
→ निवडणुका या राष्ट्रीय सणासारख्या आहेत. या राष्ट्रीय सणात प्रत्येक मतदाराने सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे. मतदानाचा दिवस म्हणजे देशाच्या नवनिर्माणाचा..... नव रचनेचा दिवस.
हा दिवस कोणत्याही वयोगटातील मतदारांनी सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय करू नये. त्याचबरोबर आणखीन एक सांगणे आहे.... यंदा बळीराजा नैसर्गिक संकटांनी हवालदिल झाला आहे.... निराश झाला आहे मात्र त्याने निराश न होता आपल्या कुटुंबियासह या लोकशाहीच्या उत्सवात मोठया आनंदाने..... मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे.
धन्यवाद......!
फारूक बागवान
(9881400405)
उप माहिती कार्यालय
पंढरपूर