पांगरी (गणेश गोडसे) :- महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य ग्रामीण अभियानांतर्गत भारतीय विकास ग्रुपतर्फे (बि.व्ही.जी.तर्फे) राबवण्यात येत असलेल्या आपत्कालीन सेवेतील जखमी रूग्ण उस्मानाबाद येथील सिव्हील रूग्णालयात घेऊन जावु नका, रूग्ण सोलापुर जिल्हयातील रूग्णालयातच घेऊन जावा यासह वरिष्ठांच्या आदेश आल्यानंतरच रूग्णवाहिका अपघातस्थळावर घेऊन जावी अशा घालण्यात आलेल्या अटी शिथील कराव्यात अशी मागणी पांगरी (ता. बार्शी) येथील ग्रामस्थांची आहे.
राज्यमार्गावर अपघात घडल्यानंतर तात्काळ उपचार उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक जखमींना आपला जिव गमवावा लागल्यामुळे याचा विचार करून शासनाने लाखो रूपये किंमतीची अत्याधुनिक सुविधांची रूग्णवाहिका राज्यमार्गावरील पांगरीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या रूग्णावाहिकेत रूग्णालयात आवश्यक असणा-या सर्व सुविधांसह गल्लेठ पगाराचे वैद्यकीय अधिकारी, चालक मदतनीस आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ऐवढे करूनही व शासन यावर कोट्यावधी रूपयांचा चुराडा करत असताना या योजना राबवताना संबंधीत यंत्रणेने घातलेल्या कांही जाचक अटीमुळे खो बसत आहे.
पांगरी हे सोलापुर-उस्मानाबाद सीमेवर व राज्यमार्गावरील महत्वाचे गांव असुन पांगरीतील अपघातग्रस्त रूग्णाला उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालय वाहतुकीसाठी व जवळचे तसेच सोईचे असताना संबंधीत आपत्कालीन व्यवस्थेच्या व्यवस्थापकांनी मात्र जखमी रूग्ण उस्मानाबाद येथे घेऊन न जाता तो रूग्ण सोलापुर जिल्हयातीलच रूग्णालयात दाखल करा असे आदेश दिले असल्याचे समजते. आपत्कालीन व्यवस्था ही 25 ते 30 किमीच्या अंतरावर असुन उस्मानाबाद या जिल्हयाचे ठिकाण 32 कि.मी.पडते.दोन कि.मी.साठी जखमीला उस्मानाबाद येथे घेऊन जावु नका असे फर्मान सोडण्या आले आहे. रूग्ण उस्मानाबाद येथे नेताना वळेत व इतर सर्वच गोष्टीची बचत होते व या सिमाभागातील जनतेच्याही सोईचे आहे. तरी ही जिल्हयातच रूग्ण दाखल करा ही अट रद्द करावी अशी मागणी आहे.