बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बार्शी पोलिसांनी शहरातील वातावरण निर्भय आणि शांततेत राहावे, यासाठी कारवाई सुरु केली आहे. विविध गुन्ह्यांशी संबंधीत व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन रात्री उशीरापर्यंत सुरु राहणार्‍या पाच हॉटेलचे परवाने रद्द करण्याचे तसेच तीन जणांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव पाठिवण्यात आले आहेत.
     शिवम हॉटेल आगळगाव रोड, गोविंद खानावळ बस स्थानकाजवळ, मराठा दरबार कुर्डूवाडी रस्ता, दिशा हॉटेल आगळगाव रोड, शालीमार हॉटेल तेलिगरणी चौक अशी हॉटेलची नावे असून अमोल पवार, रुपेश सदावर्ते, समीर तांबोळी यांचे हद्दपारीचे प्रस्ताव पाठिवण्यात आले आहेत.
     बार्शी पोलिसांनी 105 पैकी 88 जणांवर वॉरंट, 244 पैकी 221 जणांना समन्स बजावणे, गंभीर गुन्ह्यासारख्या कृत्यास सहकार्य करणेच्या 107 पैकी 102 जणांवर कारवाई, 15 सराईत अपराध्यांवर कारवाई, 2 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, दखल पात्र गुन्ह्यातील 125 जणांवर नोटीस बजावणी, जनावरांसंबंधी एकावर कारवाई, दारुबंदीच्या 48 केसेस करुन 2 लाख 72 हजार 550 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
     अवैध प्रवासी वाहतुक करणार्‍या 49 केसेस मधून 49 हजारांचा दंड वसुल, दुचाकी वाहने व इतर 1009 केसेसमधून 1 लाख 2 हजार 300 रुपांचा दंड वसूल करण्यात आला. शहर हद्दीतील 114 शस्त्रपरवाना धारकांची शस्त्रे जमा करण्यात आली. फरारी 37 आरोपींना अटक करण्यात आली, विविध गुन्ह्याशी संबंधीत पाहिजे असलेल्या 2 जणांना अटक करण्यात आली. मोहल्ला कमिटीच्या 17 बैठकांतून सामाजिक शांतता व सलोख्याची माहिती देण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
Top