उस्मानाबाद :- महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम येथील जिल्हा पोलीस संचलन मैदानावर सकाळी 8 वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सकाळी 7-50 वाजता ध्वजारोहण होणार  आहे.
       ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विभाग व यंत्रणांनी त्यांना सोपविलेली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र दिन कार्यक्रम आयोजनाबाबतची पूर्वतयारी बैठक पार पडली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर, उपविभागीय अधिकारी  प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह विविध यंत्रणांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.     
 
Top