उस्मानाबाद :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक दि. 21 रोजी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली. एचआयव्ही बाधित रुग्णांना तातडीने औषधोपचार देण्याबाबत यावेळी पाटील यांनी संबंधित यंत्रणेला आदेशित केले.
     यावेळी जिल्हयातील एचआयव्ही संसर्गीत बालकांची संख्या विचारात घेऊन नवीन प्रस्ताव व त्यासाठी आवश्यक औषध साठा यांचा प्रस्ताव पाठविण्याबाबत सांगीतले. गरोदर मातांची एचआयव्ही  तपासणी  झाली पाहिजे.  सन 2014-15 करिता त्या अनुषंगाने नियोजन आराखडा सादर करणेबाबत सुचना देण्यात आल्या. नॅशनल फ्रेमवर्क, एचआयव्ही- टी.बी. रुग्णांसाठी तसेच संसर्गीत गरोदर माता, ऑपशन बी प्लस, एचआयव्ही टी.बी. रुग्णांकरीता प्रोव्हायडर इनिशिएटेड टेस्टींग अँड कौंसिलिंग या नवीन तपासणीबाबत सर्व वैद्यकीय अधिका-यांनी जागृत राहुन उपचार देण्याबाबत सांगीतले. एकात्मिक सल्ला व तपसाणी केंद्राकडून एचआयव्ही  बाधित रुग्णांना तातडीने एआरटी सेंटरला पाठवून योग्य ते उपचार झाले पाहीजेत असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगीतले.
        जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे एआरटी सेंटरमधुन आयसीटीसी केंद्रामार्फत संसर्गीतांची अत्यावश्यक सर्व तपासण्या करुन औषधोपचार केला जातो. ज्याचे सीडी-4 प्रमाण  350 पेक्षा जास्त आहे, त्यांची प्रत्येक सहा महिन्याला सीडी -4 तपासणी करण्यात येते. तसेच दुसरे एआरटी केंद्र उमरगा, लोहारा व तुळजापूर येथे सुरु करण्यात आले असून जिल्ह्यात 42 पी.एच.सी. मध्ये एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र सुरु असून पी.पी.पी. के्ंद्र 26 आहेत. जानेवारी, 2014 पासून लिंक वर्कर प्रोजेक्ट सुरु झाला असून 2013 पासून सी.एस.सी. केंद्र एचआयव्ही  संसर्गीतांसाठी सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे यांनी यावेळी दिली.
         यावेळी नोडल ऑफिसर डॉ. टी.एच. माने, डॉ. शिवाजी फुलारी, डॉ. आर.एन.देशमुख, डॉ. दिग्गज दापके, डॉ. एन.के. गाडेकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक गणेश काकडे, सुजित जाधव, तांदळे, श्रीमती दीपाली करंडे, महादेव शिनगारे, जिल्हा पर्यवेक्षक महादेव शितोळे आदि उपस्थित होते.                  
 
Top