बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येत्या १७ तारखेला होत असलेल्या लोकसभा निवडणूकी संदर्भात बार्शी पोलिसांच्या वतीने वाढीव कर्मचार्यांसह बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस उपअधिक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सालार चाऊस, सहाय्यक पोलिस निरीक्षक व आठ सहाय्यक पोलिस अधिकार्यांसह महिला व पुरुष सुमारे १०० पोलिस कर्मचारी यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन संचलन केले.
निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसाठी आणखी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत असून कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी दिली.