उस्मानाबाद :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.
येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासही सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद आगारात डॉ. नारनवरे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विभाग नियंत्रक एन.एस. भानप, आगार प्रमुख प्रमोद जगताप, हाश्मी, ए. टी. गायकवाड कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
नगर परिषदेत मुख्याधिकारी चारठाणकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.