उस्मानाबाद :- 40- उस्मानाबाद लोकसभा निवडणूक प्रक्रिया चालू असल्यामुळे  जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बॅंका, नागरी व ग्रामीण पतसंस्था,शहरी बँका,मल्टी स्टेट को-ऑप.बँक व मल्टी स्टेट को-ऑप-क्रेडिट सोसायटी तसेच बँकाशिवाय पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या संस्था यांचे आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या बैठकीतील सूचनेनुसार  समिती स्थापन केली.  यामध्ये कक्ष प्रमुख, जिल्हा खर्च संनियंत्रण कक्ष तथा जिल्हा कोषागार अधिकारी राहूल कदम यांची अध्यक्ष म्हणून तर  लेखाधिकारी (शिक्षण) डी. व्ही. सुळ हे समितीचे सदस्य  राहणार आहेत.
         या समितीतील सदस्य पुढीलप्रमाणे जिल्हा निबंधकचे एस. पी. बडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी  बी. आर. दुपारगुडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. के. खांडके यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
          या समितीमार्फत निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या विविध पथकातील व्हीडिओ सर्वेक्षण पथक, व्हीडिओ पाहणी पथक, लेखा पथक, फिरते पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, अधिकारी/कर्मचाऱ्यांमार्फत निवडणूक कालावधीत सर्व संस्थांच्या आर्थिक व्यवहारांसह खालील मुदयांवर बारकाईने लक्ष व नियंत्रण ठेवण्याबाबत  समिती  सूचना देतील.
        उमेदवार/त्याचे कुंटुंबीय यांचेव्दारे संबंधित संस्थातील खात्यातून 50 हजाराची जास्तीची रक्कम आहरित करणेसह एक लाखापेक्षा जास्तीची रक्कम भरणा केली जाणे, उमेदवार/त्याचे कुंटुंबीय/त्यांचे नातेवाईक यांचेव्दारा केलेल्या व्यवहारांचे तपशिल घेणे, आचारसंहिता लागू झाल्यापासून संस्थामधून 10 लाखापेक्षा जास्तीच्या व्यवहार करणाऱ्या व्यक्तींच्या व्यवहारांची तपशिलवार माहिती घेणे, संस्था/ उमेदवार/ त्यांचे कुटंबीय यांचेसह अन्य खातेदारांकडून झालेल्या / होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांचा अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तात्काळ सादर करणे, संस्था, उमेदवार/त्यांचे कुटुंबीय यांचेसह अन्य व्यक्तींकडून होणारे पैशाचे वाटप, वस्तूंचे/ भेटीचे वाटप, वस्तुंचे आदान प्रदान होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घेतील, असेही कक्ष प्रमुख, जिल्हा खर्च नियंत्राण कक्ष, 40- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ,उसमानाबाद यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 
Top