बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गौतमबुध्द मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात १२३ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
    राऊत चाळ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कॉंग्रेसचे नगरसेवक विजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक नाना वाणी, अभिजीत राऊत,रवि राऊत, पट्टम पवार, सावळा शिंदे, शब्बीरभाई पठाण आदि उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदेश काकडे, दिपक धावारे, प्रविण रिकीबे, सागर लंकेश्वर, किरण काकडे, पंकज वाघमारे, गौतम वाघमारे, रणदिल, पंडित राजगुरु, सूरज नागटिळक, प्रविण दोडमणी, राहुल कांबळे, रणजित चांदणे, विजय अंगारखे, भैय्या धावरे, आकाश वाघमारे,  मिलींद ताकपिरे यांनी परिश्रम घेतले.
 
Top