पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) येथे मंगळवार दि. 15 एप्रिलपासुन हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत जगदगुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले असल्याची माहिती मारूती मंदिर देवस्थान पंचकमिटीतर्फे प्रसिदधीपत्रकाद्वारे दिली आहे.
    ह.भ.प.महादेव तांबे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व माणकोजी बोधले महाराज यांच्या आशिर्वादाने पार पडणा-या अखंड हरिनाम व गाथा पारायण सोहळा दि. 21 एप्रिल पर्यंत चालणार असुन महादेव तांबे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. भगवान धावणे व रामचंद्र बनसोडे यांच्या वतीने काल्याच्या महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येणार आहे. येथील मारूती मंदिराच्या सभागृहात पार पडणा-या या सप्ताहात पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 7 ते 10 गाथा पारायण, 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 12 ते 3 भोजन व विश्रांती, 3 ते 5 भजन, 5 ते 6 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकिर्तन व 11 ते पहाटे 4 पर्यंत हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच मंगळवारी दि.15 एप्रिल रोजी ह.भ.प.श्रीरंग क्षिरसागर, 16 रोजी गिरीधर बापु सामनगांवकर, 17 रोजी कु. ऐश्‍वर्या बैरागी धाराशिवकर, 18 रोजी आप्पा महाराज हळदगांवकर, 19 रोजी ज्ञानेश्‍वर जाधव महाराज जवळेकर, 20 रोजी रामलिंग मोरे महाराज ममदापुरकर व 21 रोजी तांबे महाराज यांच्‍या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहेत. तसेच मुरलीधर लिमकर व्यंकटेश महिला भजनी मंडळ, पांडुरंग महिला भजनी मंडळ, प्रभाकर शिंदे, विठ्ठल पवार यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहेत. दि.18 एप्रिलला प्रशांत कापसे वैरागकर यांचा भारूडाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी अचानक, शिवप्रेमी, जय भवानी, नृसिंह तरूण मंडळासह मारूती देवस्थान कमिटीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
 
Top