उमरगा -: बोरी (ता. उमरगा) येथील एका शेतक-यांने बँकेच्या कर्जाला कंटाळून  विष प्राशन करून आत्महत्या केली.
    विश्वनाथ भीमराव जाधव (60) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. विश्‍वनाथ जाधव यांनी दि. 21 एप्रिल रोजी विष प्राशन केले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवार दि. 25 एप्रिल रोजी मृत्यू झाला. विश्वनाथ जाधव यांच्या नावे एक हेक्टर 95 आर तर त्यांचा मुलगा सुरेश यांच्या नावे एक हेक्टर 55 आर शेतजमीन आहे. या दोघांच्या संयुक्त नावावर स्टेट बँक ऑफ हैद्राबादकडून (शाखा माडज) ट्रॅक्टर खरेदीसाठी आठ लाख रुपये कर्ज काढण्यात आले होते. या कर्जाची थकीत रक्कम भरण्यास असर्मथ ठरत असल्याने नैराश्यातून विश्वनाथ जाधव यांनी विष प्राशन केले.
 
Top