उस्मानाबाद -: जिल्ह्यात 42 प्राथमिक आरोग्य केंद्र व 206 उपकेंद्राच्या ठिकाणी महिलांसाठीचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.
    हा उपक्रम 1 मे पासून राबविण्यात येणार असून यांचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या स्तरावर करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण स्तरावर प्रा.आ.केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी महिलांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. तसेच उपस्थित महिलांना आरोग्यसेवेबाबत माहितीसह हळदी-कुंकू या सारखे इतर सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. 
आरोग्य विभागामार्फत गरोदर मातांची तपासणी,उपचार,संस्थात्मक प्रसुतीचे महत्व जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, कुटूंब कल्याण, प्रसुती अगोदर व प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी, कुपोषण, किशोरवयीन मुलींसाठी सॅनीटरी नॅपकीनचा वापर, गरोदर मातांसाठी आर्यन फॉलीक ॲसीड गोळयांची माहिती, लसीकरण आदि माहिती देण्यात येणार आहे.
     तरी जिल्ह्यातील महिलांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.हाश्मी यांनी केले आहे.
 
Top