बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: इंडिका वाहनातून विना पास परमीटची देशी विदेशी दारु वाहतूक होत असल्याची माहिती बार्शी पोलिसांच्या मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले. यावेळी ३८,९६० रुपये किमतीचा देशी विदेशी दारुचा साठा हस्तगत करण्यात आला.
    पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, पो.ना.नाईकवाडी, पो.ना.बाबर, घाटगे, कोष्टी, पांढरे हे गस्त घालत असतांना खबर्‍याकडून माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्या मार्गदर्शनानुसार पाळत ठेवत बाळेश्वर नाका येथे सदरचे वाहन आल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले.
      अवैध वाहतूक करणार्‍या वाहन चालक बाबू त्रिंबक वय २३ रा.पारगांव ता.परंडा जि.धाराशिव (उस्मानाबाद) डोके यास पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली असून त्याच्याकडून ३१,६८० रुपये किमतीची संत्रा देशी दारु, २,६०० रुपये किमतीची इंपेरिअर ब्लू विदेशी दारु, १३२० रुपये किमतींची किंगफिशर कंपनीची बिअर, ३,३६० रुपये किंमतीची गोवाजीन विदेशी दारु तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी इंडिका क्र.एम.एच.१२ ए.एन.६५६ जप्त केली. चालक डोके याने सदरची दारु चंद्रकांत पिसे यांच्या दुकानातून घेतल्याचे सांगीतले. पोलिस नाईक अमोल भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मु.प्रोव्ही. ऍक्ट ६५(ई) नुसार चालक बाबू डोके, दारु विक्रेता चंद्रकांत पिसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पो.ना.विश्वास शिणगारे हे करीत आहेत.
 
Top