भूम -: मराठा व धनगर समाजाला आघाडी सरकारने धोका दिला आहे. परंतु मोदींचे सरकार आल्यानंतर मात्र निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण देत धनगर समाजालाही अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत शिफारस केली जाईल. शिवाय अवकाळी आणि गारपीट ग्रस्तांसह शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कर्ज आणि वीजबिल माफीचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षार्चे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत दिले.
    थील तालुका दूध संघाच्या प्रांगणात महायुतीचे लोकसभेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारार्थ गोपीनाथ मुंडे यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आमदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकरराव बोरकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, नितीन काळे, अँड. मिलिंद पाटील आदींची उपस्थिती होती.
    डे म्हणाले, 'उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्य तर आमदार राहुल मोटे यांनी तालुका दूध संघ दिवाळखोरीत काढला. राष्ट्रवादी काँग्रेसची राजवट उलथवून टाकण्यासाठी मतदार आतुर झाला आहे. जिल्ह्यासह राज्याला दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांना ऐक वेळ संधी द्या.' उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतील पाच जणांबाबत शंका उपस्थित करून मेटेला उद्देशून सहावा कशासाठी घेतला, असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला.
    घाडीने राज्याला महागाई दिली. यामुळे 72 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. 15 वर्षे खेळवले. राज्यातील आघाडीमध्ये बिघाडी आहे. दोघांत एकमेकांचे जमत नाही. परंतु, तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना अशी गत आहे. यातच मराठा समाजाचे नेते शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे महायुतीमध्ये आल्याने त्यांची दातखिळी बसली आहे. मराठवाड्यातील सर्व जागा महायुतीच्या निवडून येणार आहेत, याचा धसका घेत अर्धे मंत्री बीडमध्ये तळ ठोकून आहेत. परंतु, मतदार त्यांचा पदार्फाश केल्याशिवाय राहणार नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देखील पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
 
Top