महादेव जाधव
पांगरी (गणेश गोडसे) :- कर्जबाजारास कंटाळुन आत्महत्या करण्‍याचे लोन मराठवाडयाचे लोन आता पश्चिम महाराष्ट्राला लागले असुन गत महिन्यात झालेल्या गारपीठित शेतातील उभी पिके नुकसानग्रस्त झाल्यामुळे व कर्जबाजारीपनास कंटाळुन आज शनिवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी कारी (ता.बार्शी) येथील तरूण शेतक-याने स्वतः गळफास लावुन घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीस आली.
    महादेव दगडु जाधव (वय 35, रा.कारी) असे कर्जास कंटाळुन आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नांव आहे. कल्याण जालिंदर चौधरी (वय 42, रा.कारी) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, मयत महादेव दगडु जाधव यांच्या शेतातील ज्वारी, गहु आदी पिकांचे गत महिन्यात झालेल्या गारपीठीमुळे मोठे नुकसान झाले होते. गारपीठीत नुकसान झाल्यामुळे मयत जाधव हे निराशेतच वावरत होते. त्यांच्याकडे बँकाचेही कर्ज होते. गारपीठीत शेतातील पिके नेस्तनाबुत झाल्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे हा प्रश्‍न त्यांना सतावत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या जाधव यांनी कारी शिवारातीलच कामराज बनसोडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास आज सकाळी स्वतः गळफास लावुन घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी पांगरी ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्‍यात आला आहे.
    कर्जास वैतागुन आत्महत्या करण्‍याच्या सत्रास पांगरी भागात सुरूवात झाल्यामुळे सर्वसामान्यांमधुन भितीयुक्त वातावरण दिसुन येत आहे. कल्याण चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून पांगरी पोलिसात अकस्मात म्हणुन गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top