पांगरी (गणेश गोडसे) :-
संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या द्राक्ष बागयतदारांच्या फसवणुक प्रकरणाचा छडा लावण्यास पांगरी (ता. बार्शी) येथील पोलिसांच्या पथकाला यश आले आले असुन शुक्रवार रोजी पहाटे सुरत (गुजरात) येथुन या फसवणुक प्रकरणातील मुख्य आरोपी ओम विर याला त्याच्या निवास्थानातुनच झोपेत असताना ताब्यात घेण्यात आले असुन यातील प्रमुख आरोपीला ताब्यात घेन्यात आल्यामुळे राज्यातील तिन-चार जिल्हयात गाजत असलेले द्राक्ष उत्पादक शेतकरी फसवणुक प्रकरण उजेडात येणार आहे.
या प्रकरणातील गुरूवारी दि. 3 रोजी पहाटे उस्मानाबाद जिल्हयातील भुम तालुक्यातील नळ वडगांव व गणेगांव येथील दोघांना द्राक्ष वाहतुक प्रकरणात सहभग असलेल्यांना वाहनासह पांगरीच्या पोलिस पथकाने याप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतरच या प्रकरणाला गती आली. आरोपी परराज्यातील असल्यामुळे जिल्हापोलिस प्रमुखांच्या परवानगीने गुरूवार रोजी सायंकाळी पांगरी पोलिसांचे तपास पथक गुजरात राज्यातील सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. आज पहाटे तेथे पोहचल्यानंतर स्थानिक पोलिसाने व गेलेल्या पथकाने पांगरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीच्या निवास्थानी अचानक छापा टाकुन आरोपीला ताब्यात घेतले. यातील धोंडिराम अंकुश बिराजदार (मुंबई) हा एक आरोपी अद्याप फरार आहे.
याबाबत वृत्त असे की, दि. 12 मार्चच्या दरम्यान सुरत येथील ओमवीर या व्यापा-यांने मुंबईतील धोडिराम अंकुश बिराजदार या स्थानिक व्यापा-याच्या मदतीने महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांना लाखो रूपयांना चुना लावला होता. पांगरी भागातील संतोष नाईकवाडी नानाप्पा मुंढे लक्ष्मण बनसोडे, जामगांव येथील पठाण, खानापुर येथील धर्मराज शिंदे आदी द्राक्ष उत्पादक शेतक-यांना व्यापा-यांनी पध्दतशीरपणे फसवुन बनावट सहयांचे बनावट धनादेशाचे वाटप करून महाराष्ट्रातुन गुजरामधील सुरत येथे पलायण करून सुरळीत व्यवहार सुरू केले होते. आपण कांहीच केले नसल्याच्या पध्दतीने आपल्या घरी निवांत निद्रा घेणा-या या सुरतच्या लुटारू विराने महाराष्ट्रातील अनेक शेतक-यांची झोपच उडवली होती. व्यापारी परराज्यातील असल्यामुळे व ते व्यापारी पळुन गेल्यामुळे वर्षभर काबाडकष्ट करून ठेवलेल्या बागांचे पैसै मिळणार का अशा अनेक प्रश्नांनी त्यांना भंडाळुन सोडले होते. अखेर पांगरी परिसरातील धाडशी द्राक्ष उत्पादक शेतक-यांनी पांगरी पोलिसात धाव घेतल्यानंतर तपासाला गती देऊन या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता, द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या फसवणुक प्रकरणाचे गुढ आणखीनच वाढत गेले. प्रकरण राज्यभर घडल्याने याची व्याप्ती सर्वदुर असल्यामुळे पोलिसांनी प्रकरण गांभिर्याने घेत आरोपीचा शोध घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
यातील प्रमुख आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे डिसेंबर 2013 पासुन मार्च 2014 या चार महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रात झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणाची उकल होण्यास मदत मिळणार आहे. पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बी.डी.होवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिलदत्त बनसोडे, प्रसाद औटी, विरभद्राप्पा कलशेटी, विनायक सुर्यवंशी, शिवानंद मोसलगी यांच्या पथकांने ही कामगिरी केली.