पांगरी (गणेश गोडसे) :- ऊस तोड कामगारांना अडवण्याच्या व पाठिमागील भांडणाच्या किरकोळ कारणावरून तिघांनी मिळुन एकाच्या अंगावर रॉकेल ओतुन पेटवुन देऊन देऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घारी (ता. बार्शी) येथील नदिकाठावर घडली.
गणपती उर्फ प्रकाश रंगनाथ घावटे (वय 32, रा.घारी) असे रॉकेल टाकुन पेटवुन दिल्यामुळे भाजलेल्या शेतक-याचे नांव असुन त्याच्यावर उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. अमृत किसन घावटे, नारायण मोहन घावटे व पांडुरंग नारायण घावटे सर्व (रा.घारी) अशी भावबंदी व भांडणाच्या कारणावरून रॉकेल टाकुन पेटवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे असुन तिघांनाही पोलिसांनी तात्काळ अटक केले आहे.
जखमी गणपती रंगनाथ घावटे या शेतक-यांने पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ते त्यांच्या गावातील जुन्या घरासमोरील गोठयात सायंकाळी सात वाजता दुध काढत असताना आरोपींनी संगनमत करून तेथे येऊन फिर्यादीस तु उस तोड कामगारांना का अडवले तु लय माजलास का असे म्हणत रॉकेल ओतुन पेटवुन देऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी व जखमी यांच्यात शेती व घरजागा वाटपाच्या व विक्रीच्या कारणावरून भांडणे आहेत. गणपती घावटे यांच्या फिर्यादिवरून शनिवार रोजी तिघांविरूध्द अंगावर रॉकेल ओतुन पेटवुन देऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.