पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी, उक्कडगांव (ता. बार्शी) परिसरात जनावरांच्या अज्ञात साथीच्या रोगाने थैमान घातले असुन सात दिवसात तीस दुभती व कामाची जनावरे मृत्युमुखी पडुन शेतक-यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतक-यांच्या अख्या दावणीच मोकळया झाल्या असल्यामुळे पांगरी परिसरात पशुपालकांमधुन खळबळ उडाली असुन पशुपालक हाताशपणे मोकळया दावणीकडे पाहताना दिसत आहेत. पशुवैद्यकीय क्षेत्रापुढे एक आव्हान उभे राहीले आहे. पशुवैद्यकीयकांनीही या आजारापुढे हात टेकले असुन संबधीत वरिष्ठ तज्ञांनी याकडे लक्ष केंद्रित करुन मृत्युमुखी पडणारे पशुधन वाचवुन शेतक-यांना दिलासा द्यावा व हानीग्रस्त पशुपालकांना कांही अंशी तरी मदत द्यावी अशी पांगरी विभागातील शेतक-यांची आग्रही मागणी आहे. आठवडयाच्या काळात एकटया उक्कडगांव येथे पंधरा शेतकयांच्या दुभत्या गायी, म्हशी, बैल आदी मुकी जनावरे मृत्युमुखी पडले असुन शासनाचा पशुवैदद्यकीय विभाग झोपला काय? असा सवाल शेतक-यांमधुन केला जात असुन आमचे सर्व पशुधन जावुन दावणी पोरक्या झाल्यावरच पशुविभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल पशुपालकांमधुन होत आहे.
पांगरी येथील कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी अनिल गरड यांची पाच महिन्यांची व सात महिन्यांची लागु गाभण दोन गायी या अज्ञात साथीच्या आजारात बळी गेल्या असुन उपचारासाठी हजारो रूपयांचा चुराडा करून व पशुवैद्यकीयय क्षेत्रातील तालुका अधिका-यांसह अणेक तज्ञांना उपचारासाठी पाचारण करूनही ते गायींना वाचवु शकले नसल्यामुळे सत्तर हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे गरड यांनी सांगितले. तसेच उक्कडगांव येथील बाबुराव हरीदास मुंढे यांचा 35 हजार रुपये किंमतीचा एक बैल लिंबाजी लाला सोनवणे या शेतक-यांची दुभती 25 हजार रूपये किमतीची म्हैस, जयराम केरबा सोनवणे या शेतक-यांची 30 हजार रूपये किमतीची एक गाय व 25 हजार रूपयांची एक म्हैस तसेच आज पुन्हा एक कालवड मयत झाली. त्याचबरोबर बजरंग रामा मुंढे यांच्या मालकीची एक म्हैस व संदिपान चांगदेव दराडे या शेतक-यांच्या पाच गायी या साथीच्या आजारात मृत्युमुखी पडल्या आहेत. संदिपान भराडे या शेतक-यांच्या दिड लाख रूपयांच्या गायी अचानक आलेल्या साथीच्या आजारात बळी गेल्यामुळे त्याचे तर पार कंबरडेच मोडले असुन दुग्धोत्पादनावर आपली उपजिविका करणाया दराडे यांना आता पुढे काय हा मोठा प्रश्न पडला आहे. शुक्रवारी उक्कडगांव येथील अनेक जनावरांमध्ये मृत झालेल्या जनावरांप्रमाणेच लक्षणे लागली आहेत.जाणवू त्यामुळे पशुपालकांचे धाबे दले असुन याची कोणीतरी दखल घ्यावी, अशी माणनी होत आहे.
पाय आखडुन खाली बसणे, मान टाकणे, शेपुट न हालवणे व बसल्यानंतर न उठणे ही लक्षणे साथीच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांमध्ये आढळुन आली असुन कितीही उपचार केले तरी जनावरे तीन ते चार दिवसात दगावतातच असे पशुपालकांनी सांगितले. गत महिन्यात पांगरी, उक्कडगांव, पांढरी आदी डोंगरी भागात प्रथमच झालेल्या गारपीठीमुळे वेगळे वातावरण तयार होऊन त्यातुन जनावरे दगावण्याची मालिका सुरू झाली असल्याचा अंदाज या भागातील शेतक-यांमधुन व्यक्त केला जात आहे. एक गोष्ट मात्र खरी की तीन वर्ष दुष्काळ गत महिन्यात गारपीठ व आता मुक्या प्राण्यांना साथीचे आजाराने बळी अशा तिहेरी संकटात बळीराजा सापडला असुन त्यांच्याजवळील पशुधन या साथीच्या आजाराने झपाटयाने कमी होऊ लागले असुन शासनाने या डोंगरी भागात असलेल्या पशुधनाचा विचार करून नव्याने आलेल्या या साथीच्या आजराला प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व उरले सुरले पशुधन वाचवुन पशुपालकांना आधार द्यावा अशी पांगरी भागातील शेतक-यांची मागणी आहे. अज्ञात साथीच्या आजारामुळे पशुपालकांचे लाखो रूपयांचे नुकसान होण्यामागे या भागात पशुवैद्यकीय विभागातर्फे एखादी लसीकरण मोहीम शिल्लक राहीली की काय याचा शोध घेऊन लसीकरण करावे, अशीही पशुपालकांची मागणी आहे. दोन पशुवैद्यकिय अधिकारी असलेल्या पांगरी भागात लागन होण्याचे कारण शोधने गरजेचे आहे.
याबाबत पांगरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एस.आर.कांबळे यांच्याकडे चौकशी केली असता, या रोगाच्या लक्षणाची साथ पांढरी, ममदापुर, उक्कडगांव आदी ठिकाणी सुरू असुन त्यावर अद्याप लस उपलब्ध नसल्याचे सांगत फ-या, घटसर्फ, लाळया, खुरकत याचे लसीकरण पुर्ण करण्यात आल्याचे कांबळे यांनी बोलताना सांगितले.
अज्ञात साथीच्या आजारामुळे जनावर दगावत असलेल्या उक्कडगांव येथील आण्णाहेब इंदरराव पाटील यांच्याकडुन धक्कादायक माहिती समोर आली असुन येथे जनावरांसाठी लसीकरण मोहिमच राबवण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी म्हणतात लसीकरण करण्यात आले. तर पशुपालक म्हणतात लसीकरण करण्यात आले नाही नेमके खरे काय याची चौकशी करून मोठया प्रमाणात लक्षणे दिसु लागल्यामुळे याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.