मंगळवेढा (समाधान फुगारे) :-  मंगळवेढ्यातील किल्ला भाग परिसरात राहणारी विवाहीत महिला रेखा तुकाराम पाटील (वय 26) हिचा स्टोव्हच्या भडका झाल्याने आंगावरील कपडे पेटून जखमी होऊन तिचा मुत्‍यूयू  झाला. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
     पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत महिला ही दि.1 मार्च रोजी घरातील स्वयंपाक करीत असताना सायंकाळी 8 वाजता स्टोव्हाचा अचानक भडका तिच्या आंगावरील कपड्याने पेट घेतला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासटी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपच्यारा दरम्यान तिचा मृत्यू झाला असून या घटनेची सी.आर.पी. 174 प्रमाणे नोंद झाली आहे.   
 
Top