बार्शी -: आज शनिवार रोजी उस्‍मानाबाद लोकसभेतील आपचे उमेदवार विक्रम सावळे यांच्‍या प्रचारार्थ बार्शी येथे आपच्‍या नेत्‍या अंजली दामानिया यांची जाहीर सभा झाली. या सभेत दामानिया यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी त्‍यांनी विरोधकावर प्रहार करुन आपचे उमेदवार विक्रम सावळै यांना विजयी करण्‍याचे आवाहन केले.
    शनिवार  दि. 12 एप्रिल रोजी बार्शी येथील महात्‍मा गांधी शॉपींग सेंटर समोर आम आदमी पार्टीचे उमेदवार सावळे यांच्‍या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्‍यात आली.  यावेळी जिल्‍हा संयोजक गाढवे गुरुजी, तालुका संयोजक अॅड. खोत, बार्शी शहरप्रमुख सिकंदर आतार, तालुका प्रमुख अॅड. श्रीकांत सुरवसे, प्रा. अशोक सावळे, विद्या सावळे आदीजण उपस्थित होते.
     यावेळी प्रा. अशोक सावळे, तालुका संयोजक अॅड. खाोत, विद्या सावळे, उमेदवार विक्रम सावळे आदींचे यावेळी भाषणे झाली. सभेचे सुत्रसंचालन रणजीत सावळे यांनी केले. यावेळी नागरीक, महिला आदीजण उपस्थित होते.
    
          
 
 
Top