उस्मानाबाद -:  जिल्ह्यात भूम,कळंब, वाशी  आणि परंडा तालुक्यातील 31 गावात व 2 वाडयात शासकीय 15 व खाजगी 20 अशा 35 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 35 गावात एकूण 49 विहिर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पुढील काळात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणेने निधीबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यगटाची टंचाई परिस्थितीबाबत साप्ताहिक बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. याप्रसंगी  निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, सचिन बारवकर,संतोष राऊत, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तांगडे, भूवैधानिक रेड्डी, जिल्हा उपनिबंधक  एस.पी.बडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त भोसले, सर्व तहसीलदार, मंडळ अधिकारी आदि यावेळी उपस्थित होते.
    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी विंधन विहिर पुर्नभरण, आवश्यक निधी प्रस्ताव, बोअर अधिग्रहण माहिती, खाजगी टँकरवर जीपीएस यंत्र बसविणे, प्रत्येक टँकरवर बोर्ड लावणे, वेळोवेळी विंधन विहिरींबाबत अहवाल सादर करणे आदि विषयांवर यावेळी आढावा घेऊन संबंधितांना सूचना दिल्या.
 
Top