उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप अधिकारी, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिन विविध उपक्रमांनी साजरा  करण्यात आला. रॅलीची शुभारंभ कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, उस्मानाबाद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत हजारे यांनी रॅलीला ध्वज दाखवून सुरुवात केली ती रॅली शिवाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व परत जिल्हा परिषद,उस्मानाबाद येथे या रॅलीचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला.
    याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. आर. आर. हाश्मी, यांनी किटकजन्य जलजन्यरोग व साथरोग या विषयावर सविस्तर माहिती दिली. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साथरोग व डासापासून होणाऱ्या रोगाचे समुळ नष्ट करण्यासाठी शपथ देण्यात आली. ग्रामस्तर व तालुकास्तरावर 7 एप्रिल ते 21 एप्रिल या कालावधीत किटकजन्य, साथरोग प्रतिबंध पंधरवाडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.
   तसेच जिल्हा परिषदेच्या आवारात आरोग्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या प्रदर्शनाचे उदघाटन सुर्यकांत हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक धाकतोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हाश्मी, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. फुलारी, निवासी वै्दयकिय अधिकारी डॉ. तानाजी माने, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राऊत, साथरोग शास्त्रज्ञ डॉ. एकबाल काझी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोमटे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गाडेकर, श्री. बोरकर, श्री.पठाण,श्री. अर्जुन लाकाळ ,परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी  सर्व आशा एएनएम (महिला), आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंध्द मोठया संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमाकांत गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोमटे यांनी मानले.                                     
 
Top