राष्ट्रवादी कोंग्रेसने कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्याबाबत सदैव झारीतील शुक्राच्यार्यचीच भूमिका बजावली असून त्यामुळे या समाजातील हजारो युवक रोजगाराच्या संधीला मुकलेले आहेत.त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रतापसिंह मोहितेपाटील यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे कोळी समाज महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अरुण्ा सांगितले.
कोळी समाजातील हजारो युवकांच्या नौक-या धोक्यात आलेल्या आहेत. उत्तर महारास्ट्रातील काही राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील महादेव कोळी समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाटी माढा मतदार संघातील कोळी समाजाच्या घराघरामध्ये जाऊन त्यांना आपली भूमिका पटवून देत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते -पाटील यांना मतदान करू नका असे आवाहन करणार असल्याची माहिती कोळी समाज महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अरुण्ा कोळी यांनी दिली आहे .