शशिकांत चव्‍हाण
मंगळवेढा (समाधान फुगारे) :
        लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने आ.भारत भालके हे केवळ थापा मारून वेळ मारून नेत असल्याची टीका भाजपचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली .
    यावेळी बोलताना चव्हाण म्‍हणाले, भारत देशात नरेंद्र मोदींची प्रचंड लाट असून मंगळवेढ्यातही मोदी यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे. याउलट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत मत
दारामध्ये मोठी चीड निर्माण आहे, या रोष्याला आ.भारत भालके यांच्यावर सामोरे जाण्याची वेळ आल्याने ते केवळ खोटी आश्वासने देत आहेत. महणूनच त्यांच्याविरुद्ध महायुतीने तक्रार केल्याचे शशिकांत चव्हाण यांनी संगितले.
 
Top