उस्मानाबाद :- 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता कक्षाची स्थापना करुन विधानसभा मतदार संघनिहाय विविध अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली होती. बार्शी विधानसभा मतदार संघासाठी त्यात अंशत: बदल करण्यात आला असून कार्यकारी अभियंता, महावितरण, उस्मानाबाद यांच्याऐवजी ही जबाबदारी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण उस्मानाबाद यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. संबंधित अधिकारी हे त्यांना नेमून दिलेल्या विधानसभा मतदार संघात जाऊन आचारसंहितेच्या अनुषंगाने होणा-या भंगाबाबत चौकशी करुन सविस्तर अहवाल दररोज आचारसंहिता कक्ष प्रमुख यांना सादर करतील.
 
Top