बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष ऍड. अब्दुल गन्नी बाबुलाल तांबोळी वय वर्ष ८३ यांचे गुरूवारी रात्री दिर्घ आजाराने निधन झाले.
    शुक्रवारी दुपारी परांडा रोडवरील तांबोळी स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे करण्यात आले. अॅड. तांबोळी यानी बार्शी न्यायालयात जवळ जवळ २० वर्ष वकीली सेवा केली. त्यावेळी त्यानी अनेक सर्वसामान्य नागरीकाना मोङ्गत कायद्याबाबत मार्गदर्शन करण्याचे काम केले. १५ दिवसापुर्वी त्याना कॅन्सर आजारावर औषधोपचार करण्यासाठी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते दोन दिवसापुर्वी घरी आणल्यानंतर गुरुवारी रात्री निधन झाले. ऍड. तांबोळी हे सन १९७४ ते १९८० या काळात उपनगराध्यक्ष म्हणून काम केले . त्यांचे आजोबा बाबुलाल तांबोळी यांचा वारसा घेऊन तंबाखू विक्री, विडया तयार करण्याचा कारखाना व होलसेल पान मटेरीयल विक्री करण्याचा व्यवसाय संभाळून वकीली व्यवसाय केला.
 
Top