सुधीर बनसोडे
कळंब :- येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 123 व्‍या जयंती उत्‍सव समितीच्‍या अध्‍यक्षपदी सुधीर बनसोडे यांची निवड करण्‍यात आली आहे.
       भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 123 व्‍या जयंतीनिमित्‍त कळंब येथील कल्‍पना नगर, यशवंतनगर, अशोक सम्राट नगर, समता नगर, बाबानगर मधील जयंती उत्‍सव समितीची बैठक लिम्‍बुनी बुध्‍दविहार यशवंतनगर येथे पी.जी. रणदिवे, बंडू बनसोडे, कालिदास सावंत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली. या बैठकीमध्‍ये पुढील पदाधिका-यांची निवड करण्‍यात आली आहे.
     अध्‍यक्षपदी सुधीर बनसोडे तर उपाध्‍यक्ष महेश कसबे, सचिव आकाश धाववारे, अमित जाधव, प्रशांत गायकवाड, कोषाध्‍यक्ष मुन्‍ना मस्‍के, अशोक सावंत, राहुल सावंत, रंजन घाडगे, संघटक म्‍हणून आकाश बनसोडे, विनोद जगताप, लाला कांबळे, पिंटू गाडे, रिंकू अंगरखे, तसेच मिरवणूक प्रमुखपदी विजय बनसोडे, सर्जेराव भालेराव, राहुल हौसलमल, रणजित गायकवाड, पिंटु कुचेकर, राजपाल गायकवाड, राजरत्‍न कसबे, यशपाल लोंढे, विठ्ठल निंगोळे, अतुल जगताप, नितीन सावंत, संतराम रणदिवे, रमेश कांबळे, दिपक गायकवाड आदींची निवड करण्‍यात आली आहे.
            
 
Top