मंगळवेढा (समाधान फुगारे) -:  मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथे तलावात पोहायला गेलेला प्रशांत सुनील माने (वय९) हा पाण्यात बुडत असताना सौ.रंजना मारुती भोरकडे या महिलेने आपला जीव धोक्यात घालून त्या बुडणार्‍या मुलास वाचविले आहे. सौ.रंजना भोरकडे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२५ रोजी खोमणाळ येथील जि.प.शाळेत इयत्‍ता तिसरीत शिकणारा प्रशांत माने हा दुपारी १ वाजता घरात आईवडिलांना न सांगता मित्राच्या बरोबर गावाळगतच असलेल्या तालावावर पोहायला गेला.प्रशांत याने आपल्या पाठीला डबा बांधून तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला पोहत असताना अचानक डब्याला बांधलेली दोरी निघाली व प्रशांत पाण्यात बुडत असताना व जीवाचा आकांत करत माला वाचवा माला वाचवा असे ओरडू लागला या दरम्यान तळ्यावर धुणे धुण्यासाठी रंजना मारुति भोरकडे ह्या आल्या होत्या. हा आवाज एकूण त्यांना आपल्या जिवाची पर्वा न करता धाडसाने पाण्यात प्रवेश केला यावेळी प्रशांतने त्या महिलेच्या गळ्याला मिट्ठी मारल्याने ती महिलाही गटांगळ्या खाऊ लागली.तिने आपली सुटका करून त्या मुलाच्या पायाला पकडून ओढत काठावर आणत असताना त्या दरम्यान समाधान कांबळे हा युवक तेथून जात होता.त्याने हे दृश्य पाहिल्यानंतर त्यानेही पाण्यात उडी मारून या दोघांना बाहेर काढले. प्रशांत याला जमिनीवर झोपवून त्याच्या नाका तोंडात पोटातिल प्रथम पाणी काढले व तात्काळ मंगळवेढा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
  सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे तसेच मागील आठवड्यात क्यानळचे पाणी आल्यामुळे व उष्णतेचा वाढता प्रहार यामुळे पाणी पाहून मुलांना पोहण्याचा मोह आवरत नाही.मात्र पालकांनी आपल्या मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेवरून व्यक्त होत आहेत.
 
Top