मुंबई -: ख्यातनाम वकील व शिवसेनेचे माजी राज्यसभा खासदार अधिक शिरोडेकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी शनिवारी रात्री ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री परळ येथील येथील राहत्या घरी शिरोडेकरांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारार्थ जसलोक हॉस्टपीटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा राजन शिरोडेकर, सून व नातवंडे असा परिवार आहे.
रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथून त्यांची अंतिमयात्रा निघाली. या अंत्ययात्रेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, माजी खासदार मोहन रावले, शिवसेना महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत, बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर आदीजण उपस्थित होते.
