बार्शी (प्रतिनिधी) -: येथील गौतमबुध्द मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ.आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीच्या खर्चास फाटा दिला. या रकमेतून शहरातील अनाथ मुलींचे भविष्य सुकर होण्यासाठी पाच मुलींच्या नावाने बँकेत मुदत ठेव ठेऊन अनोखा उपक्रम राबविला.
    मंडळाच्या वतीने रविवारी दि.२७ रोजी प्रसिध्द गायक आनंद शिंदे व सहकारी यांच्या समाजप्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत, कुर्डूवाडी येथील उपनगराध्यक्ष बापूसाहेब जगताप, सोलापूर येथील जी.एम.ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, रावसाहेब मनगिरे, नगरसेवक विजय राऊत, पट्टम पवार, नगरसेवक अशोक बोकेफोडे आदी उपस्थित होते.
 
Top