बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी शहरातील आझाद चौक येथे असलेल्या महावितरणच्या मध्यवर्ती कार्यालयास अचानकपणे आग लागली. अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली व त्यांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.
    शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सदरचा प्रकार झाला. मध्यवर्ती कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या २५० किलोवॅट व ३०० किलोवॅट विद्युत रोहित्राच्या तापमानात झालेल्या बदलानंतर सदरची आग लागली. याच्या जवळील खोल्यांमध्ये असलेल्या जुन्या दफ्तराची कागदपत्रे असलेल्या खोलीत आगीने पेट घेतला. सदरच्या दुर्घटनेचा सुगावा लागल्याने कर्मचार्‍यांनी तात्काळ अग्निशमन विभाग, महावितरणच्या इतर विभागाशी संपर्क साधून गावातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद केला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. महावितरणचे अधिकारी विवेक ढोले, पी.आर.शेंडगे, अशिफ शेख, एन.एम.दाभाडे, एस.आर.शेंडगे, व्ही.के.घोलप,मोरे, जगताप, जाधव, जावेद शेख, सोनवणे, यांनी सुरुवातीस आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाचे ए.डी.राऊत, भारत गुंड, कैलास धुमाळ, चौधरी यांच्यासह सहाय्यक कर्मचार्‍यांनी आग तात्काळ आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
 
Top