बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक मकरंद रानडे यांनी बार्शी पोलिस ठाण्यास भेट देऊन निवडणूकीसंदर्भात मार्गदर्शन केले.
    याप्रसंगी पोलिस निरीक्षक सालार चाऊस, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक डाके, पोलिस उपनिरीक्षक अतुल भोस, पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, पोलिस उपनिरीक्षक यू.एस.वाळके व कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी घ्यावयाची काळजी, सामान्य नागरिकांची सुरक्षा, बार्शी तालुक्यातील बुथरचना, प्रचारयंत्रणा, जाहीरसभांचे नियोजन तसेच भगवंत मैदानावरील होत असलेल्या मोठ्या जाहीर सभांचे नियोजन, संवेदनशील मतदानकेंद्रे, अवैध व्यवसाय, फरार आरोपी, शस्त्र परवाने, रक्कम अथवा मादक पदार्थांचे मतदारांना प्रलोभने यावर पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत असून कोणत्याही अनुचित प्रकारांना थारा देण्यात येणार नसल्याचेही रानडे यांनी यावेळी सांगीतले.
 
Top