उस्मानाबाद :- येथील श्री  तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम समिती सदस्यांची सभा नुकतीच  जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. 
         या बैठकीतील निर्णयानुसार जिल्हा स्टेडीयम वापर नियमावलीची अंमलबजावणी दि. 1 जून 2014 पासून होणार असून  स्टेडीयमचा वापर करणा-या क्रीडा प्रेमींनी आपले रजिस्ट्रेशन फॉर्म, फोटो व मासिक शुल्क जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत जमा करावे. स्टेडीयम मध्ये दि. 1 जून, 2014 पासून ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, याची नोंद घ्यावी असे जिल्हा क्रीडाधिकारी संजीव कुलकर्णी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.           
 
Top