उस्मानाबाद -: जिल्हयातील आजी /माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना कळविण्यात येते की, मराठा रेजिमेंटल केंद्र,बेळगाव (कर्नाटक) येथे 2 जून 2014 पासून युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुकांनी  1 जून 2014 रोजी सकाळी 6 वा. मराठा एल.आय.रेजिमेंटल सेंटर, बेळगाव (कर्नाटक) येथे भरतीसाठी शैक्षणिक प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, चारित्र्याचा दाखला व इतर सर्व कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.               
माजी सैनिकांसाठी पोलीस शिपाई भरती
उस्मानाबाद -: जिल्हयातील माजी सैनिकांना कळविण्यात येते की, सन 2014 साठी दि.25 मे पर्यंत ऑनलाईन आवेदन अर्ज भरता येतील. अधिक माहितीसाठी  www.mahapolice.mahaonline.gov.in  या संकेतस्थावर विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहे.  ईच्छूक माजी सैनिकांनी या भरतीचा लाभ घ्यावा, असे मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 
Top