उस्मानाबाद -: कृषि विभाग व राष्ट्रीय केमिकल्स अँड फल्टीलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषि निविष्ठा विक्रेते यांची एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा कृषि अधिक्षक शंकर तोटावार, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मदनलाल मिणीयार, आदि उपस्थित होते.
    यावेळी डॉ.नारनवरे म्हणाले की, कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी बियाणांचा साठा करुन न ठेवता शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावा. शेतक-यांची अडवणूक करु नये, दिवसेदिवस बियाण्यांच्या प्रतवारीत बदल होत आहे. त्यामुळे चांगले प्रतीचे बियाणे पारखून घ्यावे. त्यामुळे पिक उत्पादन चांगले मिळेल, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक हंगामाचे नियोजन करुन बियाणे व खते उपलब्ध करुन घ्यावेत. विक्रेत्यांनी दुकानामध्ये उपलब्ध साठा व त्याचे भाव फलक दर्शनी भागावर लावावेत व विक्री करतांना योग्य भावातच विक्री करावेत, असे निर्देश त्यांनी कार्यशाळेत दिले.
    प्रास्ताविक तोटावार यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी/कर्मचारी, बियाणे विक्रेते आदि उपस्थित होते.                
 
Top