पांगरी (गणेश गोडसे) -: मित्र हॉटेलमध्ये का आला या कारणावरुन चिडुन हॉटेलमालकासह तिघांनी मिळुन दोन ग्राहकांना तलवार लोखंडी गज व काठिने बेदम मारहान करून गंभीर जखमी करत गळयातील अडीच तोळयाच्या सोन्याच्या ब्रासलेटसह रोख आठ हजार रूपये व मोबाईल हॅन्डसेटस काढुन घेतल्याची घटना बार्शी तुळजापुर मार्गावारील बावी (आ) ता. बार्शी येथील हॉटेल फ्रेन्डस कॉटेजसमोर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
नानासाहेब तुकाराम काळे (वय 46) व सलीम उस्मान मुलाणी दोघेही (रा. पिंपळगांव देशमुख, ता. बार्शी) अशी तलवार व गजहल्यात गंभिर जखमी झालेल्यांची नांवे असुन महादेव आगलावे, नितीन आगलावे व यशवंत आगलावे (तिघेही रा. बावी आगलावी) अशी मारहाण करूण पैसै व ब्रासलेट काढुन घेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत. जखमींवर बार्शीच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी नानासाहेब काळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ते हॉटेलमध्ये काजुकरीची पार्सल आनण्यासाठी गेले असता दरम्यानच्या काळात त्यांचा मित्र सलीम मुलाणी हा तेथे आला असता हॉटेलमधील आगलावे कंपनींनी त्याला तलवार, लोखंडी गज व काठीने बेदम मारहान करून मुलाणी यांच्या गळयातील 75 हजार रूपये किंमतीचे अडीच तोळयाचे एक ब्रासलेट, खिशातील रोख आठ हजार रूपये व दोन मोबाईल हॅन्डसेट असे साहित्य काढुन घेत अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ दमदाटी केली. काळे यांच्या फिर्यादिवरूण हॉटेलमधील तिघांविरूदध मारहान करून खिशातील रोख रकमेसह सोन्याचे ब्रासलेट व मोबाईल काढुन घेतल्याप्रकरणी पांगरी पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असुन अधिक तपास हवालदार रविंद्र भडुरे हे करत आहेत.