मुंबई -: राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक बोर्डाकून मार्च 2014 मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या बारावी परीक्षेचा निकाल दि. 2 जून रोजी जाहीर करण्‍यात येणार आहे. त्‍याच दिवशी दुपारी एक वाजल्‍यापासून बारावीचा निकाल विद्यार्थ्‍यांना ऑनलाईन पाहता येणार असल्‍याची माहिती राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षक मंडळाच्‍यावतीने देण्‍यात आली.
      पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्‍हापूर, मुंबई, लातूर, अमरावती व कोकण नऊ विभागांचा निकाल एकाचवेळी जाहीर करण्‍यात येणार आहे. कनिष्‍ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्‍यांच्‍या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शवणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळाच्‍यावतीने 10 जून रोजी सकाळी अकरा वाजता करण्‍यात येईल. त्‍याचदिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्‍यांना गुणपत्रिकांचे वाटप महाविद्यालयात करण्‍यात येईल.
 या संकेतस्‍थावर निकाल पाहता येईल :

www.maharesult.nic.in

www.maharashtraeduction.com

www.hscresult.mkcl.org

www.rediff.com/exams
 
     
 
Top