परंडा :- आनाळा (ता. परंडा) येथे 50 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार दि. 3 मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अंभी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली. लक्ष्मण संभाजी कोलते (रा. आनाळा) हा हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याने शनिवारी आनाळा शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.