मंगळवेढा (समाधान फुगारे) :- मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे स्मारक होणे गरजेचे असून या स्मारकासाठी लागणार्या निधिचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करू या प्रयत्नात आम्ही कुठेही कमी पडणार नाही.अशी ग्वाही मंगळवेढा संतभूमी विकास समितीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी गावासाठी काय पण या कार्यक्रमाचे उद्घाटन समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत होते.
व्यासपीठावर वीरशौव पतसंस्थेचे चेअरमन श्रीशैल्य हवनाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण, उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गणपाटील, मंडळाचे अध्यक्ष अशोक माळी,आदी उपस्थित होते.
यावेळी समाधान आवताडे पुढे बोलताना म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात जाती-पातीच्या पलीकडे जावून समाजाचा व त्यातील घटकांचा उद्धार केला.त्या काळामध्ये त्यांनी आंतरजातीय विवाहसुद्धा घडवून आणला.आपले जीवन हे समाजकल्यानासाठी आहे असे समजून ते जगले.त्यांचे बारा वर्षे वास्तव्य मंगळवेढा भूमीत होते. त्यांचे कर्मभूमि मंगळवेढा असल्याने हे इथल्या जनतेचे भाग्यच म्हणावे लागेल.त्यांचे स्मारक मंगळवेढयामध्ये होण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न होत आहेत.होणारे स्मारक जागतिक पातळीवरील आहे.त्याच्यासाठी मंगळवेढ्यातील ताकद एकजुटीने लावणे गरजेचे आहे. मंगळवेढ्यातील उपेक्षित संताच्या स्मारकांच्या विकासासाठी मंगळवेढा संतभूमी विकास समितीची स्थापना करण्यात आली असून स्वामी समर्थ,कान्होपात्रा,गोपाबाई,चोखामेळा आदी संताच्या स्मारकांच्या उभारणीसाठी ही समिति प्रयत्नशील असल्याचे समाधान आवताडे यांनी सांगितले.