उस्मानाबाद - श्री दिंगबर जैन सिद्धक्षेत्र, कुंथलगिरी व शांति-विद्या ज्ञानसंवर्धन समितीच्या वतीने कुंथलगिरी येथे १९ ते २८ मे या कालावधीत सम्यग्दर्शन संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
     कुंथलगिरी सिद्धक्षेत्रावर आचार्य १०८ शितलसागरजी महाराजांचे ससंघ सानिध्य प्राप्त होण्याची संभावाना आहे. सम्यग्दर्शन संस्कार शिबीरामध्ये तत्वार्थसूत्र, द्रव्यसंग्रह, छहढाला, रत्नकरण्डश्रावकाचार, जिनागम प्रवेश, भक्तामर, बालबोध १,२ या सर्व जैन धर्मग्रंथाचे सखोल ज्ञान प्राप्त होणार आहे. याशिबीरासाठी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध विदवान ब्र.संदिप भैय्या, सरल, ब्र.तात्याभैय्या नेजकर, ब्र.महावीर भैय्या, ब्र.अजित भैय्या, ब्र.पवन भैय्या, पं.डॉ.अभयजी दगडे, डॉ.उज्वला गोसावी, डॉ.सुधीर शास्त्री, पं.अनंत शास्त्री, पं.नितीन बोंद्रे, पं.प्रभावती पाटील, पं.रावसाहेब चौगुले, पं.श्रीकांत शहा, ब्र.अ‍ॅड.सुरगोंडा पाटील, प्रा.सरोज लेहाडिया, सा.बा.पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच इंग्रजी मेडियम मुलांसाठी बालबोध १-२ इंग्लिश मधून शिवकण्याची व्यवस्था केली आहे. भूपाळ येथील योगाचार्य फुलचंद जैन यांच्या सानिध्यात योगविद्या अभ्यास घेण्यात येणार आहे.
        शिबीराचे उदघाटन रविवार दि.१८ मे रोजी सायंकाळी ७ वा. पुणे येथील पुष्पक शहा, अतुल शहा, ढाकळकर शितलकुमार शहा, पुणे येथील भरतेश शहा, अभयकुमार बरगाले, इचलकरंजी येथील अजित केतकाळे, रवि मसालेचे फुलचंद जैन, मनोहरकर औरंगाबाद यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
        शिबीरात सहभागी होणा-या शिबीरार्थींनी आपले फॉर्म सर्व माहितीनिशी भरून १० मे पर्यंत श्री क्षेत्र कुंथलगिरी कार्यालयात जमा कराव्यात. फॉर्मसाठी कुंथलगिरी येथे ०२४७८-२७६८६०,२७६४९१ या क्रमांकावर संपर्क साधवा. तरी जास्तीत जास्त जैन श्रावक-श्राविकांनी या शिबीरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन कुंथलगिरीचे अध्यक्ष अरविंद दोशी, सचिव वालचंद संघवी, उपाध्यक्ष सुभाष गांधी यांनी केले आहे.
 
Top