बार्शी : चांगले विचार मनावर संस्कार करून जातात. त्यामुळे आपले जीवन सुंदर करण्यासाठी चांगल्या विचारांची कास धरली पाहिजे व त्याशिवाय आपल्याला व समाजाला शांति मिळणार नाही, असे प्रतिपादन गोवा कला अकादमीचे माजी संचालक डों. सुधीर उर्फ गोविंद काळे यांनी केले.
येथील सहयोग स्थानिक रहिवासी मंडळाच्या 20 व्या मासिक सभे निमित्त आयोजित “आपणही तरोणी विश्व तारा “ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी डों श्रीहरी शिनगारे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती महादेव अंधारे,बालरोगतज्ञ डों. प्रशांत मोहिरे होते.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संतोष ठोंबरे,उपाध्यक्ष सतीश गोडगे,मार्गदर्शक अविनाश सोलवट, खजिनदार रामदास तिकटे,सहसचिव राहुल बनसोडे आदि उपस्थित होते.
भगवंताच्या पाठीमागे उभी असलेली लक्ष्मी हे अद्वैत प्रेमाचे दर्शन आहे. जगणायसाठी चांगल्या विचारांची गरज असते. चांगले विचारच मनावर संस्कार करून जातात. तसेच बदल ही काळाची गरज आहे. याचे भान ठेवून आपल्यामुळे इतरांची शांति बिघडणार नाही,याची काळजी प्रत्येकाने घ्यावी,असे आवाहन करून काम,क्रोध,लोभ याचा त्याग केला पाहिजे. तसेच परोपकार करीत असताना सर्वांना पोटाशी घेणारे माझेपण सोडेले पाहिजे,असे संगितले.
प्रास्ताविक प्रतापराव जगदाळे यांनी केले.अविनाश सोलवट यांनी प्रत्येकणी आपल्या परिसरातील अडीअडीचणीची एकत्रित यादी करून ती मंडळाकडे द्यावी, असे आवाहन केले.सूत्रसंचालन ह.भ.प.विलास जगदाळे व प्रकाश गव्हणे यांनी केले तर आभार अविनाश सोलवट यांनी मांडले.
यावेळी डों.सुधीर काळे यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून या भागात अद्यावत वाचनालय सुरू करावे व त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा,असे सुचवून या वाचनालयासाठी पुस्तके जमा करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या अनुषंगाने प्लॉट मधील युवक कामाला लागले आहेत.