उमरगा -: युजीसी व श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी (ता.उमरगा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६, ७ व ८ मे रोजी श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी येथे उमरगा तालुक्यातील सर्व सरपंच व तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांसाठी गांधी विचार व प्रचार शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबीरात मान्यवर गांधीवादी विचारवंतांचे मार्गदर्शन लाभणार असून सदरील कार्यक्रमास उमरगा तालुक्यातील सर्व सरपंच व तंटामुक्तीच्या समितीच्या अध्यक्षांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजन समितीने केलेले आहे.
या शिबीराचे उद्घाटन दिनांक ६ मे रोजी सकाळी १० वाजता डॉ.डी.के.डोंगरगावकर (नवी मुंबई) यांच्या हस्ते होणार असून सदरील कार्यक्रमास डॉ.दामोदर पतंगे (उमरगा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सूर्यनारायण रणसुभे लातूर हे असणार आहेत. दिनांक ६ मे रोजी दुपारी १ ते २.३० या दरम्यान चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले असून प्रमुख वक्ते म्हणून डॉ.श्रीकांत गायकवाड लातूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीपाल सबनिस (पुणे) हे असणार आहेत. दुपारी ३ ते ४.३० या दरम्यान दुसर्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले असून प्रमुख वक्ते म्हणून फ.म.शहाजिंदे (लातूर) व अध्यक्ष म्हणून प्रा.एम.एस.दडगे (पुणे) हे असणार आहेत.
दि. ७ मे रोजी दुपारी १ ते २.३० यादरम्यान चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले असून प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे प्रमुख वक्ते असणार आहेत. तर अध्यक्षम्हणून डॉ.विजयकुमार वाघमारे (जालना) हे लाभलेले आहेत. दुपारी ३ ते ४.३० या वेळात दुसर्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून प्रा.शाम आगळे लातूर हे प्रमुख वक्ते असून अंबाजोगाई येथील पत्रकार अमर हबीब हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. दिनांक ८ मे रोजी सकाळी १० वाजता शिबीराचा समारोप ठेवण्यात आला असून प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.नागोराव कुंभार (लातूर) हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.राघवेंद्र शाईवाले, अध्यक्ष श्रीकृष्ण शिक्षण संस्था गुंजोटी व जयंत कुकंडाकर (नांदेड) हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूर येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सिद्रामप्पा आलुरे गुरूजी हे असणार आहेत.तरी उमरगा तालुक्यातील सर्व सरपंच व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी सदरील शिबीरात सहभागी होवून गांधीवादी विचारांचा अभ्यास व प्रचार करावा, असे आवाहन श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दा.ब.पतंगे, श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर.कुलकर्णी व गांधी विचार अभ्यास केंद्र गुंजोटीचे संचालक डॉ.मिलिंद सूर्यवंशी व कार्यक्रमाच्या संयोजन समितीने केलेले आहे.