उस्मानाबाद -: जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांच्यावतीने  मे व जुन, 2014  या महिन्यात कल्याण संघटकाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      यानुसार 16 मे 2014 रोजी तहसील कार्यालय, उमरगा, 12 जुन, तहसील कार्यालय, कळंब, 19 जुन रोजी तहसील कार्यालय, वाशी, 23 मे रोजी तहसील कार्यालय, लोहारा  आणि 26 जुन 2014 रोजी तहसील कार्यालय,भूम येथे संघटक सकाळी 10 ते  सायंकाळी 5-45 या दरम्यान भेट देवून तेथे उपस्थित असलेल्या  माजी सैनिक/विधवा/युध्द विधवा व अवलंबितांच्या अडी-अडचणी सोडवून योग्य ते मार्गदर्शन करतील. तेंव्हा माजी सैनिक/विधवा/युध्द विधवा व अवलंबितांनी या संधीचा लाभ घेवून आपली कामे तालुक्याच्या ठिकाणीच करुन घ्यावे, असे आवाहन उस्मानाबादचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर सुभाष सासने यांनी केले.                    
 
Top