उस्मानाबाद :- 40-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ निवडणूकीची मतमोजणी शुक्रवार, दिनांक 16 मे रोजी येथील शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय येथे होणार आहे. या मतमोजणी संदर्भात आज मतमोजणी पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहायक यांना प्रशिक्षण देण्यात आले.
            निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
    मतमोजणी प्रक्रियेसंदर्भातील सर्व तांत्रिक बाबींसह प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी करावयाच्या  कार्यवाहीची  माहिती यावेळी श्री. मुळे यांनी सादरीकरणाव्दारे दिली.                        
                मतमोजणी  प्रक्रियेसंदर्भात पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहायक यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी रविंद्र गुरव, संतोष राऊत, सचिन बारवकर, तहसीलदार सुभाष काकडे, यांच्यासह विविध अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. 
 
Top