उस्मानाबाद :- मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाविद्यालयीन व खुला अशा दोन गटात घेतली जात आहे.
    पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद उस्मानाबादला मिळावे, यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा आग्रही आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व संघटनांनी देखील या मागणीला पाठींबा देवून संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वार्थाने सहभाग नोंदविण्याची तयारी दर्शविली आहे. उस्मानाबादला संमेलनाचे यजमानपद मिळाल्यास ते कशा पद्धतीने यशस्वीरीत्या पार पाडता येईल, यासाठी सर्वांच्या सूचना विचारात घेतल्या जात आहेत. अशा सूचना लेखी स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून ‘आदर्श अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कसे असावे?’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाविद्यालयीन आणि खुला अशा दोन गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शब्दमर्यादा २००० शब्द एवढी आहे. सदर निबंध सुवाच्च अक्षरात असावा. उस्मानाबाद जिल्ह्यातील आठही तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके स्वतंत्रपणे महाविद्यालयीन आणि खुला या दोन्ही गटांमधून दिली जाणार आहेत. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जातील. एका विशेष समारंभात या पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल. सदर निबंध दि. २२ मे २०१४ पर्यंत ‘नितिन तावडे, भानू नगर, उस्मानाबाद,-४१३५०१’ पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने पाठवावेत. अधिक माहितीसाठी रवींद्र केसकर (८४११९५९३६३), राजेंद्र अत्रे (९९२१७४०७७५), भा. न. शेळके (९९२१०५१६८९), बालाजी तांबे (९४२१३५७०७२), नितिन तावडे (९७३००६९७१६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top